नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, विक्रमगड आदी आदिवासीबहुल भागातील जुनेजाणते आदिवासी नेतृत्वच काळाच्या पडद्याआड गेले. गेल्या तीन वर्षांत आदिवासी भागाचे नेतृत्व केलेल्या साऱ्याच नेत्यांचे एकापाठोपाठ निधन झाल्याने नव्या पिढीकडे जिल्ह्य़ाचे नेतृत्व येणार आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

डहाणू मतदारसंघाचे माजी आमदार व माजी उपमंत्री शंकर नम यांच्या निधनाने पालघर जिल्ह्य़ातील जुनेजाणते सारेच प्रस्थापित आदिवासी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अलीकडेच डहाणूचे माजी खासदार दामू बारकू  शिंगडा यांचे निधन झाले होते. हे दोघेही काँग्रेसचे नेते. भाजपमध्ये चिंतामण वनगा आणि विष्णू सावरा ही जोडगोळी होती. वनगा यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर विष्णू सावरा यांचे निधन झाले. याबरोबरच आदिवासी समाजातील नवे नेतृत्व कृष्णा घोडा हेसुद्धा काळाच्या पडद्याआड गेले.

डहाणू विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे कृष्णा घोडा (६०) यांचे २४ मे २०१४ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी १९९८, १९९९ व २००४ या विधानसभा निवडणुकीत डहाणूमधून तर २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे पालघरमधून प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी उर्वरित काळात आमदार म्हणून निवडून आले होते. ३० जानेवारी २०१८ रोजी दिल्ली येथे अकस्मात निधन पावलेले चिंतामण वनगा यांनी १९९६, १९९९ (डहाणू) व २०१४ (पालघर)च्या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत त्याने विक्रमगड क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. ते काही संसदीय समित्यांचे सदस्य होते तसेच त्यांनी भाजपमधील अनेक महत्त्वपूर्ण पक्षीय जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

१९९०, १९९५, १९९९ व २००४ मधील विधानसभा निवडणुकीत वाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तसेच सन २००९ मध्ये भिवंडी ग्रामीण तर २०१४ मध्ये विक्रमगड क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे विष्णू सावरा (७०) हे ९ डिसेंबर २०२० रोजी पडद्याआड गेले. सलग सहा विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या विष्णू सावरा यांना युती सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री तसेच पालघरचे पालकत्व देण्यात आले होते. २०१४ आमदारकीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांना आजाराने ग्रासले होते. विष्णू सावरा यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

२०१४ विधानसभा निवडणुकीत डहाणू मतदारसंघातून भाजपकडून निवडून आलेले व पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळणारे पास्कल धनारे (४९) यांचे एप्रिलमध्ये करोनामुळे मृत्यू झाला. वनगा व सावरा यांच्या पश्चात धनारे यांच्याकडे भाजपने पालघर जिल्ह्य़ाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पक्षाला मोठा फटका बसला.

१९८०, १९८४, १९८९, १९९१ व सन २००५ या लोकसभा निवडणुकांमध्ये डहाणू मतदारसंघातून विजय ठरलेले व काँग्रेस पक्षाचे ग्रामीण भागाचे आधारवड असणारे दामू शिंगडा (६७) यांचे गेल्याच महिन्यात करोनामधून बरे होत असताना अकस्मात निधन झाले. अनेक वर्षे दामू शिंगडा हे पालघर ग्रामीण भागाचे दिल्लीत प्रतिनिधित्व करायचे. काँग्रेस पक्षाशी व गांधी घराण्याशी ते अखेपर्यंत निष्ठावंत राहिले. काँग्रेस पक्षाचा ग्रामीण आदिवासी चेहेरा म्हणून त्यांची ओळख होती.

दामू शिंगडा यांचे व्याही तसेच तीन वेळा आमदार व एकदा खासदारकी उपभोगणारे राज्याचे आदिवासी विभाग व अन्य विभागाचे उपमंत्रीपद भूषवणारे शंकर नाम (७२) यांचे गेल्याच आठवडय़ात हृदयविकाराने निधन झाले. १९८५, १९९० व १९९५ अशा तीन प्रसंगी डहाणू विधानसभा क्षेत्रातून तर १९९८ मध्ये डहाणू लोकसभा क्षेत्रातून ते विजय ठरले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस काही काळ शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला होता.

समस्या सोडविण्यात योगदान

* पालघर जिल्ह्य़ाच्या आदिवासी भागात आदिवासी बांधवांचा विकास घडवून आणण्यासाठी, परिसरातील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी या सर्व नेतेमंडळींचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. या मंडळींची आदिवासी समाजाशी नाळ जोडली गेली होती. समाजबांधवांच्या लग्नसमारंभ व इतर सुख-दु:खात ते सहभागी होत असत. तत्कालीन ठाणे जिल्ह्य़ाचा हा आदिवासीबहुल भाग असल्याने या भागाची की समस्या मांडण्यासाठी तसेच भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी या लोकप्रतिनिधींचे प्रयत्न राहिले. नव्या जिल्ह्य़ातील भागाचा १९८० ते २०१४ दरम्यानचा ते जणू चेहरा होते.

* १९५७ व १९६७ विधानसभा निवडणुकीत पालघरचे नेतृत्व करणारे तसेच १९६२ झाली पंचायत समिती सभापतीपद भूषवणारे ज्येष्ठ समाजवादी नेते नवनीतभाई शहा (९६) यांचेदेखील २६ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले. आदिवासी बांधव व मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले होते.