21 October 2019

News Flash

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

मुस्कान कौसर शेख (वय एक वर्ष चार महिने) असे मयत मुलीचे नाव आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राहाता : मोकाट कु त्र्यांनी केलेल्या हल्लय़ात एक वर्ष चार महिन्याची मुलगी ठार झाली. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर— प्रवरानगर रस्त्याच्या कडेला असलेल्या घोगरे यांच्या घासाच्या शेतात  झाली.

मुस्कान कौसर शेख (वय एक वर्ष चार महिने) असे मयत मुलीचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मयत मुस्कान तिची आई व इतर तीन ते चार महिला बाभळेश्वर—प्रवरानगर रस्त्यालगत असलेल्या घोगरे यांच्या शेतात घास कापीत असताना मयत मुस्कान ही जवळच शेतातील घासात खेळत होती. त्या वेळी तेथे असलेल्या चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी या मुलीवर अचानक हल्ला चढवला. या मुलीला वाचविण्यासाठी महिलांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावत जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच  मुस्कान मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शिर्डी येथून आणलेले मोकाट कुत्रे बाभळेश्व्र शिवारातील ओढय़ाजवळ आणून सोडल्याची तक्रार संतप्त नागरिकांनी केली आहे. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

First Published on April 16, 2019 4:42 am

Web Title: girl killed in attack by stray dogs