23 September 2020

News Flash

मुंडे यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिंचे रविवारी येथील गोदावरीतील रामकुंडात नातेवाईक, कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.

| June 16, 2014 01:05 am

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिंचे रविवारी येथील गोदावरीतील रामकुंडात नातेवाईक, कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण केली. शनिवारी दुपारी मुंबईहून भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुरेश पाटील यांनी अस्थीकलश शहरात आणला. प्रथम पाथर्डी फाटा येथील कार्यालयात अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजप मुख्यालयात तो आणण्यात आला. येथेही कार्यकर्त्यांसह नेत्यांनी दर्शनासाठी रिघ लावली होती. रविवारी सकाळी गंगापूर रस्त्यावरील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या डोंगरे वसतीगृह मैदानावर अस्थीकलश ठेवण्यात आला. त्यानंतर अशोक स्तंभ, रविवार कारंजामार्गे रामकुंड अशी अस्थीकलश यात्रा काढण्यात आली.सजविलेल्या रथात अस्थीकलश ठेवण्यात आला होता. रामकुंडात दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे काका सुधाकर महाजन आणि इतरांनी अस्थिंचे विसर्जन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:05 am

Web Title: gopinath mundes ashes immersed in godavari
टॅग Gopinath Munde
Next Stories
1 नाशिक-पुणे रेल्वेमार्ग अद्याप प्रशासकीय मान्यतेविना
2 ऐषारामी जीवन जगणा-या चोरटय़ाला अटक
3 सोनसाखळी चोरटा गजाआड
Just Now!
X