भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे आव्हानच हर्षवर्धन जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवेंना दिले आहे. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपदेखील केले आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“रावसाहेब दानवे यांनी आजवर माझ्यावर केंद्राच्या सत्तेचा वापर करून गुन्हे दाखल केले आहेत हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्याच दरम्यान एकदा रावसाहेब दानवे मला एकदा म्हणाले होते की, तुला नाक घासत आणले नाही, तर रावसाहेब दानवे नाव सांगणार नाही. अशी मस्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांना कटाक्ष भावनेने सांगतो की, पुढील जालना लोकसभा मतदारसंघात पाडून दाखविल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
sharad Pawar
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका, “सत्तेचा उन्माद..”
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

पुण्यात साधारण दोन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. जामीन मिळून बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडली.

यावेळी हर्षवर्धन जाधव म्हणाले की, “माझ्यावर आणि माझी सहकारी ईशा झा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल विनम्रपूर्वक सांगायचे आहे की, आम्हा दोघांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व घटनाक्रम पाहिला तर कुठे तरी पाणी मुरल्याचे दिसत आहे. माझ्यातील आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद याला पूर्णपणे कारणीभूत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ समोर आणला होता. तेव्हा त्यात मी म्हटले होते की, रावसाहेब दानवे हे माझ्या जिवावर उठले आहेत. माझ्यावर वेगवेगळया पद्धतीच्या केसेस दाखल करणार अशी त्यांनी धमकी दिल्याचेही मी बोललो होतो. जेव्हा अशा गोष्टी होतील त्यावेळी रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरण्यात यावे अशी भूमिका मी मांडली होती. तशीच परिस्थिती आजच आहे”.

“आजवर अनेक घटनांमधून रावसाहेब दानवे यांचे नाव पुढे येत असून केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर वापर करून गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व घटना लक्षात घेता. मला आणि माझी सहकारी दोघांना बाहेर पडताना एक भीती वाटते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमच्या सारख्यांना संरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.