धवल कुलकर्णी

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी सुरू आहे. अशात एक नवीच समस्या उद्भवली आहे. आर्थिक व्यवहार बंद असल्यामुळे अभयारण्याच्या जवळ असलेल्या गावातील मंडळी जंगलांमध्ये अवैधरित्या प्रवेश करून अवैध वृक्षतोड व शिकार करत आहेत.असे करण्यास वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी रोखले तर त्यांना धमकावणे किंवा त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत.टाळेबंदी सुरू झाल्यापासून अवैध शिकारीचे प्रकार राज्यभरात काही ठिकाणी उघडकीस आले आहेत.

शिकार किंवा वृक्षतोडीसारखे गैरप्रकार घडू नयेत म्हणून कोका वन्यजीव अभयारण्य तर्फे गावात जनजागृती सूचना फलक लावण्यात आले आहेत आणि मेघा फोन द्वारे जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. असे असून सुद्धा लाकडांच्या कालावधीमध्ये कोका वन्यजीव अभयारण्य मध्ये अवैध वृक्षतोड ही करिता गेलेल्या काही स्त्री पुरुषांकडून उपद्रव शुल्क वसूल केल्यामुळे या रागातून या नागरिकांनी खात्याने लावलेले कॅमेरा ट्रॅक्टर चोरून नेला आहे. असे केल्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोका वन्यजीव अभयारण्य च्या अधिकाऱ्यांनी अशी सूचना केली आहे की कोणत्याही व्यक्तीने विनापरवानगी जंगलात फिरू नये किंवा वन कायद्याचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये. असे केल्यास या व्यक्तींच्या विरोधात वनविभागाद्वारे भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा व्यक्ती व आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस विभागामार्फत सुद्धा गुन्हा नोंद करण्यात येतील असे कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले.