राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या संख्येने भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ३०० वर पोहचली आहे.

आज आढळलेल्या १६६ रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील ९९ व ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ९२ पुरुष व ७४ महिला रुग्ण आहेत. आतापर्यंत ३ हजार ८२४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ३ हजार १४९ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तपासणी करण्यात आलेल्या १ हजार ३ स्वॅबपैकी आज १६६ रुग्णांचा करोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आज औरंगाबाद शहरात आढळलेल्या ९९ रुग्णांमध्ये हर्सुल जटवाडा रोड (१), मिल कॉर्नर (१), एन अकरा, हडको (५), सिडको (१), अमृतसाई प्लाजा (२१), भगतसिंग नगर (१), एन सहा सिडको (१), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (१), एकनाथ नगर (१), शहागंज (१), शिवाजी नगर (२), कटकट गेट (१), वसंत विहार (१), हुसेन कॉलनी (१), मारोती नगर (२), देवळाई (१), सातारागाव (१), चिकलठाणा (२), नंदनवन कॉलनी (१), राजेसंभाजी नगर (३), स्वराज नगर (१), उस्मानपुरा (१), जवाहर कॉलनी (१), पिसादेवी (१), समर्थ नगर (१), एन सात, आयोध्या नगर (१), हर्सुल (१), खोकडपुरा (३), पैठण गेट (१), शिवशंकर कॉलनी (४), पवन नगर (१), जाफर गेट (१), पद्मपुरा (१४), दशमेश नगर (१), गजानन नगर (२), रमा नगर (१), सुरेवाडी (१), जालान नगर (३), ज्योती नगर (१), छावणी (२), राम नगर (१), फुले चौक, औरंगपुरा (१), एसटी कॉलनी (१), जाधववाडी (३), टीव्ही सेंटर (२) येथील करोनाबाधित आहेत.

तर, ग्रामीण भागातील ६७ रुग्णांमध्ये दत्त नगर, रांजणगाव (२), रांजणगाव (२), कराडी मोहल्ला, पैठण (१), वरूड काझी (१), सारोळा, कन्नड (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), अजिंठा (२०), वडगाव कोल्हाटी (१), सिडको बजाज नगर (१), वडगाव साईनगर, बजाज नगर (१), छत्रपती नगर, वडगाव (२), वडगाव, बजाज नगर (१), विश्व विजय सो., बजाज नगर (१), एकदंत सो., बजाज नगर (१), आनंद जनसागर, बजाज नगर (१), वळदगाव (१), सुवास्तू सो., बजाज नगर (१), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (६), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (४), साराकिर्ती, बजाज नगर (२), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (२), पाटोदा, बजाज नगर (२), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (२), अन्य (१), बालाजी सो., बजाज नगर (४), लक्ष्मी नगर, पैठण (४), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनदरम्यान वाळूज येथील सर्व उद्योगही बंद ठेवले जणार आहेत. या बंददरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवेबाबतचे सर्व निर्णय पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांसमवेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस खासदार इम्तियाज जलील यांची मात्र अनुपस्थिती होती.