News Flash

महाराष्ट्रात आढळले करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण

मुंबईतील पाच, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे.

हो, ‘मेड इन इंडिया’ ‘कोव्हॅक्सीन’ २०० टक्के सुरक्षित, भारत बायोटेकचा मोठा दावा

दरम्यान आता महाराष्ट्रातही करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. “ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान करोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. करोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या करोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

आयसीएमआरनं शनिवारी म्हटलं होतं की, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं भारताने यशस्वीरित्या ‘कल्चर’ केलं आहे. ‘कल्चर’ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी नियंत्रित परिस्थितीत तयार केल्या जातात. विशेषतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणाबाहेर ही प्रक्रिया केली जाते.

मिरा भाईंदर मध्ये नव्या करोना स्ट्रेनचा रुग्ण
ब्रिटन मधून भारतात परतलेल्या मिरा रोड येथील एका रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये नव्या करोना आजाराचे विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे त्या रुग्णाला कोविड उपचार केंद्रात ठेवण्यात आले असून त्यावर उपचार सुरु आहे.

हा रुग्ण २१ डिसेंबर रोजी ब्रिटन मधून भारतात परतला होता.भारतात आल्यानंतर हा रुग्ण आपल्या पत्नीसह गृह विलगीकरणात होता. मात्र राज्य शासनाकडून ब्रिटन मधून आलेल्या नागरिकांची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेमार्फ़त या रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवालात हा रुग्ण नव्या करोना आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 6:48 pm

Web Title: in maharashtra eight patient found of new corona virus strain inform by health minister rajesh tope dmp 82
Next Stories
1 “औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं”; प्रकाश आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
2 “भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”
3 पंतप्रधानांकडून भेटीसाठी वेळ मिळत नाहीये; संभाजीराजे यांनी व्यक्त केली खंत
Just Now!
X