टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इंडिया, एआयसीटीई, डीएसटी आणि आयआयएम-बी यांच्या सहयोगातून भारतभरातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी इंडिया इनोव्हेशन चॅलेंज डिझाइन काँटेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. २०१८ मध्ये आयआयसीडीसी १७६० कॉलेजमधील २६००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. या स्पर्धेत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी २० स्टार्ट-अप्स सुरू केले आणि १५० हून अधिक पेटंटसाठी अर्ज केले आहेत. कृषी, कचरा व्यवस्थापन, शहरी सोयीसुविधा अशा बहुविध स्टार्ट-अप संकल्पना आयआयसीडीसीमध्ये बहरल्या आहेत.

टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स इंडिया (टीआय इंडिया), ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई), भारतातील तंत्रशिक्षण नियामक मंडळ आणि राष्ट्रीय पातळीवरील कौन्सिल, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी) आणि इंडियन इन्स्टि्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरु (आयआयएमबी) यांनी एकत्र येत प्रयोगशील परिसंस्था बळकट करणे, कौशल्ये वृद्धिंगत करणे आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप संस्कृती रुजवणे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी भारताच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही इंडिया इनोव्हेशन चॅलेंज डिझाइन काँटेस्ट (आयआयसीडीसी) उपलब्ध होईल, याची खातरजमा करण्यात येणार आहे. आयआयसीडीसी ही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्पर्धा आहे.

आयआयसीडीसी २०१९ची अधिकृत घोषणा

टीआय इंडियाने टीआय इंडिया इनोव्हेशन चॅलेंज डिझाइन काँटेस्ट (आयआयसीडीसी) २०१९ या आगामी पर्वाची घोषणा केली. यासाठी २३ जुलै २०१९ ते ३० ऑगस्ट २०१९ या काळात नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांची नोंदणी करून या स्पर्धेत भाग घेता येईल. यासाठीची लिंक: https://innovate.mygov.in/iicdc2019/

या वर्षीच्या १० विजेत्या संघांची घोषणा करताना आयआयसीडीसी २०१८ च्या अंतिम फेरीत ही घोषणा करण्यात आली. अंतिम फेरीतील १० संघांना आपली स्टार्ट अप संकल्पना प्रयोगशाळेतून बाजारपेठेत नेता येणार आहे. यासाठी डीएसटीतर्फे ४.९४ कोटी रुपयांचा निधी, आयआयएम बेंगळुरुच्या एनएसआरसीईएल या इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीप हबमध्ये प्रयोग करण्याची सोय आणि टीआय इंजिनीअर्सचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच टीआय टूल्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सोय केली जाणार आहे. आजवर आयआयसीडीसीने २० स्टार्ट-अप्सची सुरुवात करून दिली आहे.

तामिळनाडूच्‍या एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स अॅण्‍ड टेक्‍नोलॉजीने ‘इंकलेस प्रिंटींग टेक्‍नोलॉजी’वर टेक्निकल इनोव्हेशनसाठी चेअरमन अॅवॉर्ड जिंकला. महाराष्‍ट्रातील ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी हे त्‍यांचे इनोव्‍हेशन ‘सोलार एनर्जी हार्वेस्टिंग फॉर वायरलेस सेन्‍सर नोड’साठी दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि पुद्दुचेरीमधील श्री मानाकुला विजयागर इंजीनिअरिंग कॉलेज हे त्‍यांचे इनोव्‍हेशन ‘मस्‍टर्ड सीड प्रोसेसर मशिन’साठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.