महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाही, खातेवाटप हे नक्की लवकरात लवकर होईल. फडणवीस म्हणतात तसं थोड्या दिवसांच  सरकार हे थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करेल. तसेच, फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं, असा टोला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडल्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.

आता आमची जी बैठक होती ती जीएसटी आणि राज्याचे स्त्रोत कसे वाढवायचे यासंदर्भात होती. खातेवाटप जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्री ते लवकरच जाहीर करतील, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.
महाविकासआघाडीच्या सरकारवर विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रतित्युत्तर देताना, जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना दुसरं काही काम आहे का? ते बिचारे असं करणारच, माझी त्यांना संपूर्ण सहानुभूती आहे. ते म्हणतात तसं थोड्यादिवसाचं सरकार थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अजिबात नाराजी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा – जनतेने जनमत दिलं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली – देवेंद्र फडणवीस

सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा तर देण्यात आल्या होत्या मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही, तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली असल्याची टीका फडणवीस यांनी आज पालघरमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आहे.