News Flash

“आता नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा मागणार का ?”; कंगना पुन्हा ट्रोल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्या नंतर आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपलं मत व्यक्त करायला सुरवात केली आहे. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मवर तिला जास्त काळ सक्रिय राहता येणार नाही, तिचं मत व्यक्त करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करतेय असं देखील यावेळी कंगना रणौतने सांगितलं आहे.

देशात सध्या करोनाने हाहाकार माजला आहे. या काळात अनेकांचे जीव ऑक्सिजन आणि औषधांअभावी तडफडून जात आहेत. अशात बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगा नदीमध्ये 70 हून जास्त मृतदेह तरंगताना दिसून आले. हे तरंगणारे मृतदेह कुणी पाण्यात सोडले याबद्दल सध्या तपास सुरू आहे. तरंगणाऱ्या या मृतदेहांचे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध कंगनाने दोन दिवसांपूर्वीच लावला होता. तर दुसरीकडे कित्येक अहवालांमध्ये हे तरंगणाऱ्या मृतदेहांचे फोटोज हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून वाहणाऱ्या गंगा नदीचे आहेत, हे सिद्ध करण्यात आलंय. तसंच हे मृतदेह करोना रूग्णांचे असू शकतात असा अंदाजही यावेळी व्यक्त कऱण्यात आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

गंगा नदी किनारी तरंगणाऱ्या मृतदेहाच्या घटनेवर अभिनेत्री कंगना रणौतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कंगनाने तिच्या फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच या ना त्या कारणाने ट्रोल होणारी कंगना रणौत पुन्हा एकदा ट्रोल होतेय. अनेक नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करत वेगवेगळ्या कमेंट्स देत तिचा हा व्हिडीओ शेअर करत आहेत. कंगना कंगना रणौतच्या व्हायरल व्हिडीओमुळे तिच्यावर टीका करत आता उत्तर प्रदेशला नाजरेरिया म्हणा, अशा प्रतिक्रिया देखील अनेक नेटकऱ्यांनी दिल्यात. काही नेटकऱ्यांनी तर लिहिलंय, “बॅंक ऑफ गंगामध्ये २००० मृतदेह नदीत तरंगताना अढळून आले, या प्रकरणावर आता नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा कंगना रणौतने मागितलाच पाहीजे…”.

इथे पहा नेटकऱ्यांचे आणखी कमेंट्स…

अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असते. कंगना आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिचं ट्विटर अकाउंटर सस्पेंड करण्यात आलं होतं. पण त्यानंतरही ती आता इंन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे वादग्रस्त विधान सुरूच ठेवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 5:25 pm

Web Title: kangana ranaut angry on congress for share fake image of from nigeria called it ganga river dead bodies prp 93
Next Stories
1 पालघर : मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी दाखल!
2 देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाइन वैद्यकीय परिषद
3 “८३५ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय मागे घ्‍या,” ठाकरे सरकारकडे मागणी
Just Now!
X