महाबळेश्‍वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून केलघर तापोळा घाट रस्त्यावर दरड कोसळून , पाणी साठल्याने व झाडे पडल्यामुळे आणि धुक्यामुळे मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक मार्ग बंद झाल्याने महाबळेश्वरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मागील दहा दिवसांपासून महाबळेश्‍वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे .आज सकाळी सातारा महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात दरड कोसळल्याने सातारा महाबळेश्वर मार्ग बंद झाला आहे.

तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे तापोळा बाजूला कडून महाबळेश्वर येणार मार्गही बंद झाला आहे . यामुळे या परिसरातील ५६ गावांचा संपर्कही तुटला आहे. वेण्णालेक वरून पाणी वाहत असल्याने पाचगणी महाबळेश्वर रस्ता ही जलमय झाला आहे. यामुळे महाबळेश्वरची वाहतूक खंडित झाली असून पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णालेक च्या खाली वाहनचालकांना रस्ता शोधत वाहन चालवावे लागत आहे . मागील २४ तासात महाबळेश्वर येथे १० इंच पावसाची नोंद झाली आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडणे जमीन खचणे खचण्याचे प्रकार समोर आले आहेत . मुसळधार पावसामुळे सर्वत्र धुके असल्यामुळे अडथळे काढण्यात ही अडचण येत आहे .महाबळेश्वर ला येणारे मार्गावर पाणीसाठ्यामुळे व दरडी कोसळणे व झाडे पडल्यामुळे मार्गावर अडथळे निर्माण झाले आहेत .मोठ्या प्रमाणात धुके पसरले असल्यामुळे मार्गावर वाहने चालवताना खूपच शिकस्त करावी लागत आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेच्या जेएसीबी च्या साहाय्याने दरड हटविल्यानंतर रास्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचे काम सुरु आहे.

पांचगणीसाठी पर्यायी रास्ता असलेल्या महाबळेश्वर – लिंगमळा रस्त्यावर देखील पाण्याचे लोंढे वाहत असून वाहतूक मंदावली आहे. लिंगमळा गावावरील मुख्य रस्त्यासह पुलावरून पाणी वाहू लागण्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरातील पावसाळी वातावरण पाहण्यासाठी अल्हादायक धुके डोंगरातून पडणारे धबधबे ,हिरवाई अनुभविण्यासाठी पर्यटक, युवा पिढी परिसरात गर्दी करत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर शेवाळे साठून घसरठे झालेले असते . अशा परिस्थितीत चालकांना वाहने चालविण्याचा अनुभव नसल्याने अपघात होण्याची शक्यता असते .पर्यटकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मागील दहा दिवसातील मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरला येणाऱ्या मार्गावरील केळघर व आंबेनळी घाटात आणि तापोळा रस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या . यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती .केळघर व आंबेनळी घाटातील दरड हटविण्यात आली असून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होत आहे .तर तापोळा रस्त्यावर मोठी दरड पडल्यामुळे येथील रस्त्यावरील भराव हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .रात्री नऊ वाजेपर्यंत रात्री पर्यंत एकेरी वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होईल. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर पाणी साठलेले आहे. परंतु पाणी पातळी कमी जास्त झाले पाणी पातळी कमी जास्त झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होत आहे. मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली महाबळेश्वर ला येणारी वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .रात्री पर्यंत सर्व मार्ग खुले होतील .
महेश गोंजारी ,उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर