आरक्षणाच्या मागणीसह कोपर्डीतील घटनेच्या निषेधासाठी महाराष्ट्रभर मराठा समाजातर्फे मराठा मूक मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे राज्यातील अर्थकेंद्रे मराठा समाजाच्याच हाती होती तेव्हा या समाजासाठीच्या आरक्षण आणि इतर बाबींकडे का डोळेझाक करण्यात आली, असा सवाल इतर समाजातील लोकांकडून केला जात आहे. समाजमाध्यमांवर आता सर्वच समाजातील लोकांनी आपापली बाजू जोरदारपणे मांडण्यास सुरूवात केल्यामुळे ही चर्चा आता भलतीच रंगात आली आहे.
आजवर मराठा समाजाचे ११ मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले. परंतु, त्यांच्या काळात अशा प्रकारे मराठा समाज एकवटलेला केव्हाच पाहायला मिळाला नाही आणि या मुख्यमंत्र्यांना आपल्या समाजासाठी एक टक्कासुध्दा आरक्षण का देता आलं नाही, असा सवाल सर्वांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री…
यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते १६ नोव्हेंबर १९६२)
पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३)
शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७)
शरद पवार (१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०)
बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३)
वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी ते १ जून १९८५)
शिवाजीराव निलंगेकर (३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६)
शरद पवार (२६ जून १९८८ ते २५ जून १९९१)
शरद पवार (६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५)
नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९)
अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९)
अशोक चव्हाण (७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३)
पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश

43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी