धवल कुलकर्णी

करोना व्हायरसचा धोका आणि देशभरामध्ये सुरु करण्यात आलेला लॉकडाउन व त्यामुळे कामगारांचे सुरू असलेले विस्थापन आणि स्थलांतर अशा अभूतपूर्व परिस्थितीचा परिणाम मुंबई आणि राज्याच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो.

शेतकऱ्यांच्या गोठ्यापासून ते दूध डेऱ्यांपर्यंत संकलनाच्या साखळीत उत्पन्न झालेल्या अडचणी, कच्चा माल जसे की कोळसा फर्नेस ऑईल आणि दुधाचे पॅकेजिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या यांचा विस्कळीत झालेला पुरवठा ही यामगची मुख्य कारणं आहेत.  पुणे व मुंबई यांच्यासारख्या शहरांमध्ये बंद असलेली दुकाने याच्यामुळे दुधाचा पुरवठा यामध्ये प्रचंड प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मुंबईच्या दुधाच्या बाजारपेठेमध्ये मोठा हिस्सा असलेल्या गोकुळ डेअरी चे व्यवस्थापकीय संचालक डी. एम. घाणेकर यांनी लोकसत्ता डॉट कॉम मला सांगितले ही परिस्थिती जर कायम राहिली तर कदाचित आठवड्यामध्ये दुधाचा पुरवठा हा विस्कळीत होऊ शकतो. “आम्हाला दूध संकलनात फारशा अडचणी जाणवत नाही. शेतकऱ्यांचे दूध आमच्यापर्यंत येत आहे पण छोट्या व्यावसायिकांना संकलनात अडचणी येत आहेत. कच्चा माल जसे की कोळसा, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमधून येणारे पशूखाद्य यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

त्यामुळे येत्या आठवड्यात परिस्थिती अधिक बिकट होईल ही शक्यता नाकारता येत नाही. डिझेल, पेट्रोल, फर्नेस ऑईल आणि दुधाचे पोलिपॅक यांच्या पुरवठ्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. ट्रक वाहतूक ही धिम्या गतीने होत आहे आणि कच्चा माल पुरवणारे कारखान्यांमध्ये कामगार नाहीत,” असे घाणेकर म्हणाले.

गोकुळ दूध संघाकडून दिवसाला साधारणपणे १२ लाख लिटर दुधाचे संकलन होते. मात्र सध्या तीन लाख लिटर दूध विक्री घटली आहे कारण बरीच दुकानं बंद आहेत. बऱ्याच दूध वितरकांकडे डिलिव्हरी बॉय कामाला जायला तयार नाहीत. संकलन केलेल्या १२ लाख लिटर दुधापैकी साधारणपणे साडेसात लाख लिटर दूध हे मुंबईमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते आणि उरलेल्या दुधाची विक्री कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होते.

अशीच परिस्थिती कोल्हापूरच्या वारणा दूध संघाची सुद्धा आहे. वारणा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन येदुरकर म्हणाले की शेतकऱ्यांकडे असलेलं दूध जरी प्रायमरी कॉपरेटिव्हकडे येत असलं तरी तिथून त्याला दूध संघापर्यंत पोहचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. याचे कारण असे ही अनेक भागांमध्ये रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

बरेच कामगार कामावर येऊ शकत नाही कारण गावाने त्यांना बाहेर पडण्यास बंदी केली आहे आणि कामावर जायला बरेचदा त्यांना गाड्यांसाठी पेट्रोल सुद्धा मिळत नाही. पोलीस मारहाण करतील या भीतीने सुद्धा बरेच लोक कामावर येऊ शकत नाहीत पण कामावर येणाऱ्या कामगारांकडून आम्ही तीन शिफ्टमध्ये काम करून घेत असलो तरी सुद्धा एक किती दिवस चालणार असाही प्रश्न त्यांनी विचारला.

येदुरकर म्हणाले की त्यांच्यावरचे बॉयलर हे उसाच्या चिप आडावर वर आणि furnace oil var चालतात. पण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यामुळे प्रभावित झाल्यामुळे फर्नेस ऑईलचा पुरवठा हा विस्कळीत झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड शिवडी येथील फॅसिलिटी कडून फर्नेस ऑईल मिळवण्यात येत असते तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत. साखर कारखान्यांकडे पुरेसे कामगार नाहीत. ही परिस्थिती खरोखरच अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. दुधाची मागणी पूर्ण करण्यामध्ये आणि त्याच्या पुरवठ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाले आहेत हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

वारणा दूध संघ हा भारतीय सैन्यदल , भारतीय नौदल आणि आसाम रायफल्सला टेट्रापॅक मधून दूध पुरवठा करतो. नौदलाला मुंबईत होणारा दूध परवठा जरी सुरळीत असला तरी सैन्यदलाला सियाचीन, जम्मू आणि पंजाब या सारख्या ठिकाणी होणारे दुधाचे वितरण याच्यावर परिणाम झाला आहे. हीच परिस्थिती आसाम रायफल ची सुद्धा आहे.

मात्र अमूल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांनी असे सांगितले की त्यांना मुंबईला दूध पुरवण्यांमध्ये येत्या दिवसात कुठलीही अडचण जाणवणार नाही. मुंबईमध्ये विकल्या जाणाऱ्या दुधामध्ये सर्वात मोठा वाटा हा अमूलचा आहे ही बाब विसरता येणार नाही.

आम्ही ही दर दिवशी साधारणपणे १६ लाख लिटर दूध मुंबईत पाठवतो. सध्या तर आम्ही हे थोड्या अधिक प्रमाणात पाठवत आहोत. काही काही ठिकाणी जरी अडचणी असल्या म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट भागांमध्ये दुकान किंवा वितरक बंद असणे वगैरे तर आम्ही पर्यायी व्यवस्था सुद्धा करत आहोत. आम्ही दुधाच्या पॅकेजिंग साठी लागणारी प्लास्टिकचे फिल्म स्वतः बनवतो त्यामुळे आम्हाला त्याच्या पुरवठ्यामध्ये कुठलीही अडचण जाणवत नाही. आमच्या ग्राहकांना पाहिजे तेवढे दूध मिळेल त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये असे सोधी यांनी आवर्जून सांगितले.

अमूल गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात मधून शेतकऱ्यांकडून दूध विकत घेऊन आपल्या ग्राहकांना पुरवते मुंबईमध्ये दर दिवशी अमूल कडून सोळा लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो त्याच्या पैकी साधारणपणे अडीच लाख लिटर दूध हे मोठ्या ग्राहकांना जसे हॉटेलला पुरवले जाते. या अशा मोठ्या ग्राहकांकडून दुधाची मागणी बंद झाली असणे तरीसुद्धा सोमवारी अमूलने मुंबईसाठी साधारणपणे पंधरा लाख लिटर दूध रवाना केले होते.

महाराष्ट्रामध्ये दर दिवशी साधारणपणे दोन कोटी ८० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते ज्याच्या पैकी साधारणपणे ४० टक्के दूध हे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वापरासाठी आणि इतर प्रॉडक्ट जसे श्रीखंड वगैरे बनवायला वापरण्यात येते. राज्यांमध्ये दर दिवशी साधारणपणे एक कोटी सहा लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जातो ज्याच्या पैकी ५५ लाख लिटर दूध हे मुंबईमध्ये विकले जाते. या ५५ लाखांपैकी साधारणपणे ४० लाख लिटर दूध हेच संघटित क्षेत्रातल्या डेरी यांकडून विकले जाते जसे अमूल, गोकुळ, वारणा वगैरे उर्वरित दूध ते असंघटित क्षेत्रातल्या उत्पादक जसे की तबेले वाले वगैरे यांच्याकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते.