औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यावरुन काँग्रेसने आक्षेप घेतला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याचं समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटला संभाजीनगर असा उल्लेख झाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यावरुन महाविकास आघाडी नाटक कंपनी असल्याची टीकाही भाजपाकडून करण्यात येत होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराचं समर्थन करताना काँग्रेसला ठणकावलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”.

bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

बाळासाहेब थोरात यांनी दिलं उत्तर –
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, “छत्रपती संभाजी महाराज आमचंही आराध्यदैवत असून श्रद्धास्थान आहे. नामांतरामुळे जे राजकारण होतं आणि माणसं दुरावतात ते होऊ नये यासाठी काँग्रेस विरोध करत असतं. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित पटवून देऊ. आम्ही एकत्र बसून चर्चा करु. आमची भूमिका कायम आहे. नामांतराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम केला असून त्याप्रमाणे काम करत आहोत. कुठे मतभेद झाले तर चर्चा करु”.

CMO च्या ट्विटमध्ये औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख!
CMO च्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण सांसकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या ट्वटिमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमित देशमुख यांचा फोटो देखील वापरण्यात आला होता.