News Flash

ठरलं! ८ जुलैपासून महाराष्ट्रात राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडणार

उपहारगृहांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही

अखेर राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्सबाबत सकारात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली ही हॉटेल्स ८ जुलैपासून उघडणार आहेत. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे.

हे आहेत नियम

हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.

रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे

ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे

रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे

सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे

मॉल्स मधली हॉटेल्स उघडण्यात येणार नाहीत

हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत

जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.

हॉटेल्समध्ये गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी ही हॉटेल चालकांची असणार आहे. थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणं आवश्यक आहे. हँड सॅनेटायझरची मोफत व्यवस्था करणं आवश्यक आहे. गेस्ट रुम, सार्वजनिक ठिकाण आणि लॉबी या ठिकाणीही सॅनेटायझर ठेवणं आवश्यक आहे. ग्लोव्ज, फेस मास्क वापरणं बंधनकारक. QR कोड, ऑनलाइन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट्स जसं ई वॉलेट वगैरे.. हे सगळं हॉटेल्सनी सुरु करावं. असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 5:13 pm

Web Title: maharashtra government to allow hotels outside containment zones to operate at 33 per cent of capacity from july 8 scj 81
टॅग : Hotels
Next Stories
1 मराठा समाजाला अशा पद्धतीनं बदनाम करणं योग्य नाही -खा. छत्रपती संभाजीराजे भोसले
2 रुग्णांची लूट थांबवा, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता; देवेंद्र फडणवीसांची सरकारला विनंती
3 राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक, भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Just Now!
X