News Flash

दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक ऑक्टोबरमध्येच जाहीर केले जाते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून  तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून ऑक्टोबरमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाते. यानुसार शुक्रवारी राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च आणि दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च दरम्यान होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsccboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळवले जाईल. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2018 4:59 pm

Web Title: maharashtra msbshse ssc hsc exam 2019 timetable schedule
Next Stories
1 व्हॉट्सअॅपवर तरुणीने केली तक्रार, ठाणे पोलीस आयुक्तांची तात्काळ कारवाई
2 नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुलाचे उद्घाटन; १६८ घरांचा आधुनिक प्रकल्प
3 पेट्रोलपाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Just Now!
X