राज्यात मागील दोन दिवस करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. त्यानंतर आता पुन्हा मागील २४ तासांमधील नवीन करोनाबाधितांची संख्या ही याच कालावधीत करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यभरात २ हजार ७६८ नवे करोनाबाधित आढळले, तर १ हजार ७३९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ४१ हजार ३९८ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ जण करोनातून बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३४ हजार ९३४ आहे असून, आजपर्यंत ५१ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट – ९५.७८ टक्के) आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्या आलेल्या १,४९,२८,१३० नमुन्यांपैकी २० लाख ४१ हजार ३९८ नमूने (१३.६७ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७३ हजार ५०४ जण गृह विलगीकरणात असून, १ हजार ९८० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.