31 October 2020

News Flash

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला, स्थगिती उठणार?

सुनावणी दरम्यान स्थगितीचा पेच सुटण्याची आशा

स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार? हा प्रश्न कायम आहे. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी ठाकरे सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे.  एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्या पीठाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच पीठा समोर ही सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात खंडपीठात न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्या. अजय रस्तोगी, न्या. हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. या सुनावणी दरम्यान काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 9:22 pm

Web Title: maratha reservation hearing on 27 october in supreme court scj 81
Next Stories
1 इराकमधल्या ‘ब्ल्यू बेबी’वर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
2 वकिलाने ग्राहकाकडून घेतले २१७ कोटी रोख रुपये; छापा टाकल्यानंतर संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले
3 काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची बाधा
Just Now!
X