05 July 2020

News Flash

मुंबईत जन्माला आलं सर्वात कमी वजनाचं बाळ

1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात 12147 अर्भक मृत्यू झाल्याही अहवाल आहे

संग्रहित

धवल कुलकर्णी

दिव्याखाली अंधार अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. याचा नेमका अर्थ काय हे जर बघायचे असेल तर आपल्याला उदाहरण देता येईल मुंबईचं… देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या या शहरांमध्ये असलेल्या झगमगाटाच्या आड दडलेली प्रचंड आर्थिक विषमता ही पावलोपावली जाणवत राहते. महाराष्ट्र सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 2018-19 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कमी वजनाचे बाळ मुंबई शहर आणि उपनगरात जन्माला आलं.

Health management information system म्हणजेच एच एम आय एस च्या अहवालानुसार राज्यात सन 2018 19 या काळात 211772 बालकांचे वजन जन्मताच अडीच किलोपेक्षा कमी असून मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची 22179 बाळं जन्मली आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे ह्यांनी विधानसभेमध्ये आमदार मंगेश कुडाळकर व इतरांनी विचारलेल्या महाराष्ट्रातील नावजात बालकांच्या मृत्यू झालेल्या वाढीबाबत च्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरांमध्ये मान्य केले.

उत्तरामध्ये टोपे पुढे म्हणाले की एचआयएएस च्या अहवालानुसार राज्यात सन 2018 19 या वर्षांमध्ये 13070 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली असून या मध्ये 1402 नवजात बालकांच्या मृत्यूंची नोंद मुंबई शहरात झाली आहे.

याच अहवालानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात 12147 अर्भक मृत्यू, 11066 बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच दिनांक 1 एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये 1070 इतके माता मृत्यूसुद्धा नोंदविण्यात आलेले आहे.

नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये अकाली जन्माला आलेले बालक, जन्मता कमी वजनाचे बालक, जंतुसंसर्ग, निमोनिया, सप्सिस, जन्मतः श्वासावरओढ, रेस्पिरेटरी distress syndrome इत्यादी आहेत. तर माता मृत्यूंच्या कारणांमध्ये प्रसूतिपूर्व उच्चरक्तदाब प्रसुती पश्चात अतिरक्तस्राव प्रसुतीपश्चात किंवा गर्भपात किंवा जंतुदोष अशी कारणं त्यामागे आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 7:14 pm

Web Title: minister rajesh tope answer on child mortality in maharashtra and mumbai dhk 81
Next Stories
1 सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका
2 मुस्लीम आरक्षणावरुन ठाकरे सरकारविरोधात देवेंद्र फडणवीस आक्रमक
3 “आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेबांनी इंदिरा गांधींशी मांडवली केली”
Just Now!
X