12 August 2020

News Flash

कराडजवळ अपघातात मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्याचे वडील ठार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. कराड) येथे झालेल्या अपघातात कुर्ला येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांचे वडील अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले

| November 27, 2012 04:35 am

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. कराड) येथे झालेल्या अपघातात कुर्ला येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांचे वडील अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले तर मंगेश कुडाळकर (४१) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजण या अपघातात जखमी झाले आहेत.कुडाळकर कुटुंबीय कोल्हापूरला निघाले होते. वाठार येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर त्यांची तवेरा गाडी आदळून सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातामध्ये अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले. कल्पना अनंत कुडाळकर (वय ६३) आणि नेहा मंगेश कुडाळकर (वय ३८) यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जय मंगेश कुडाळकर (वय १२) हाही जखमी आहे. मंगेश कुडाळकर यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
या अपघातामध्ये यश मंगेश कुडाळकर (वय १४) बचावला असून ट्रकचा चालक सिकंदर जमखंडीकर हाही जखमी झाला आहे. ट्रक पुण्याच्या दिशेकडे तोंड करून थांबला होता तर मोटार कोल्हापूरच्या दिशेने निघाली असताना हा अपघात झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2012 4:35 am

Web Title: mumbais one of shivsena leaders father died in accident in karad
टॅग Karad
Next Stories
1 आंबेडकरवादी मंत्र्यांना निळी टोपी घालण्याचे आवाहन
2 मराठवाडय़ास दोन दिवसांत पाणी
3 भारनियमनमुक्ती विसराच!
Just Now!
X