News Flash

नानासाहेब गोखले यांचे निधन

ज्येष्ठ चित्रकार, लेखक आणि शतायुषी कवी नारायण वासुदेव उपाख्य नानासाहेब गोखले यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते १०३ वर्षांंचे होते.

| November 2, 2014 04:40 am

ज्येष्ठ चित्रकार, लेखक आणि शतायुषी  कवी नारायण वासुदेव उपाख्य नानासाहेब गोखले यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते १०३ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा आचार्य विवेक गोखले आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अकोल्यात ३ जून १९११ रोजी जन्मलेले नानासाहेब गोखले यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अकोला, इंदौर आणि जबलपूरमध्ये झाले. त्यानंतर १९४१ पासून दर्यापूरच्या प्रबोधन महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. १९७२ मध्ये उत्कृष्ट शिक्षकाचा राज्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. सेवानिवृत्तीनंतर २००७ ला ते नागपूरला आले आणि त्यानंतर त्यांनी चित्रनिर्मिती आणि विविध विषयांवर लेखन सुरू केले. चित्रकलेचे कुठलेही शिक्षण न घेता केवळ छंद म्हणून जोपासणाऱ्या नानांनी विविध विषयांवर चित्र रेखाटली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 4:40 am

Web Title: nanasaheb gokhle dies
Next Stories
1 राज्यात दंगली घडवण्याचा कट?
2 ‘जवखेडा’प्रकरणी राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
3 जवखेडा निषेध मोर्चात हुल्लडबाजांची दगडफेक
Just Now!
X