भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारून आपला अपमान केल्याचा गंभीर आरोप एका महिला सरपंचाने केला आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या महिला सरपंच त्यांना ग्रामसभेत आलेला अनुभव कथन करत असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. तसेच, पोलिसांकडून देखील अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप देखील या महिला सरपंचांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमधून केली आहे.

“उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा”, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

नेमकं झालं काय?

नगर जिल्ह्यातील उक्कडगावमध्ये राणी मच्छिंद्र काथोरे या सरपंच आहेत. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायचीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप राणी काथोरे यांनी केला आहे. “गावात ग्रामसभा चालू असताना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. समोरच्या पार्टीला तो मान्य नव्हता. त्यांनी आरडाओरडा केला. मी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असं सांगितलं. पण तेही त्यांना मान्य झालं नाही. त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला”, अशी माहिती राणी काथोरे यांनी या व्हिडीओमध्ये दिली आहे.

“लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक”

दरम्यान, ग्रामसभेमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर जेव्हा राणी कथोरे कार्यालयाकडे निघाल्या, तेव्हा भाजपाच्या गुंडांनी मागून लाथ मारल्याचा दावा राणी काथोरे यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे. “कार्यालयात जात असताना त्यांच्या काही गुंडांनी येऊन मला पाठीमागून लाथ मारली. शिवीगाळ केली. लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली. मला सोडवायला येणाऱ्या लोकांनाही मारहाण केली. मी पोलीस स्टेशनला गेले. पण तिथे माझी दखल घेतली गेली नाही. मला २ ते ४ तास बसवून ठेवलं. त्यांच्यावर कुणाचा दबाव असेल, तर तेही त्यांनी मला सांगावं. मला न्याय मिळावा आणि त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, एवढीच विनंती करते’, असं या व्हिडीओमध्ये काथोरे यांनी सांगितलं आहे.

 

रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटसोबत शेअर केला आहे.