वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपा नेते राज्य सरकावर आरोप करत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर अन्वय नाईक कुटुंबीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावर स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पुणे येथील अमनोरा पार्क येथे छत्रभुज नरसी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित होते.

सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो पाच वर्ष जुना आहे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं”.

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर पहिल्यांदाच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बिहार निवडणूक निकालावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“….तुमच्या वयाला शोभत नाही,” शरद पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला सल्ला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.