सिंधुदुर्गनगरी येथे सुमारे ५०० कैदी बांधव राहतील असे नवीन कारागृह सुरू होणार आहे. तेथे ओपन जेलचा प्रयोग केला जाईल. राज्यभरातील कैद्यांना तेथे ठेवले जाईल असे पश्चिम विभाग व मुंबई कोकण प्रभारी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बोलताना सांगितले.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
police checked groom vehicle
शुभमंगल नंतर आधी सावधान! पोलिसांनी नवरदेवाच्या गाडीची घेतली झाडाझाडती; काय आहे नेमका प्रकार?

सावंतवाडी जिल्हा कारागृहाला भेट देण्यासाठी स्वाती साठे आल्या असता विश्रामगृहावर बोलत होत्या. यावेळी कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले व तुरुंगाधिकारी हेमंत पाटील उपस्थित होते.

सावंतवाडी जिल्हा कारागृहात विविधांगी प्रयोग करण्यात आले आहेत. अंकुश सदाफुले व हेमंत पाटील यांनी कैद्यांसोबतच सामाजिक भान ठेवल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळेच त्यांना समाजाचे सहकार्य मिळत आहे. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा कारागृह ५०० कैद्यांची क्षमता असणारे आहे. शिक्षा भोगणाऱ्या बंदी कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या कारागृहाचा वापर ओपन जेल म्हणून करण्यात येईल. तेथे कैद्यांना रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल असे स्वाती साठे म्हणाल्या.

कोल्हापूर कारागृहात दोन हजार बंदी कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी सुमारे ५०० जणांना घाटगे पाटील कंपनीच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटगे पाटील कंपनीशी तसा करार झाला आहे. प्रथम प्रायोगिक तत्त्वावर कैद्यांना घाटगे पाटील कंपनीच्या प्रॉडक्टची कल्पना देऊन त्यांना रोजगार मिळेल. कैदी सुटका झाल्यावरदेखील कंपनी रोजगार देईल. ही कंपनी गाडय़ांसाठी लागणारे पार्ट बनवत आहे असे स्वाती साठे म्हणाल्या.

कोल्हापूर कारागृहात ओपन जेलच्या माध्यमातून बंदी कैद्यांना कंपनीतदेखील प्रत्यक्षात काम करण्यासाठी नेण्याचा प्रयत्न आहे. शासन स्तरावर प्रयत्न असून हा प्रयोग यशस्वी झाला तर निश्चितच शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या जीवनात नवीन बदल घडतील असे स्वाती साठे म्हणाल्या. कारागृहात जामर बसविले गेले आहेत, त्यामुळे मोबाइल संभाषण थांबेल. कारागृह ते न्यायालय असा आरोपींचा प्रवास गंभीरपणे शासनाने घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्स्िंाग सुरू केला. अबू सालेमला व्हिडीओ कॉन्फरन्सचा वापर करून न्यायालयाने खटला चालविला आहे असे स्वाती साठे यांनी सांगून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कैद्यासाठी फार उपयुक्त आहे असे त्या म्हणाल्या.