12 August 2020

News Flash

उस्मानाबाद : सहा कैद्यांसह १९ जण करोना पॉझिटिव्ह

करोनाबाधितांची एकूण संख्या साडेतीनशे पेक्षाही अधिक

प्रतिकात्मक छायाचित्र

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या साडेतीनशेहून अधिक झाली आहे. तात्पुरत्या कारागृहातील सहा कैद्यांसह १९ जणांना बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे आजवर कोरोनाबाधितांची संख्या ३५४ वर पोहचली आहे.

९ व १० जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयमार्फत लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविालय व अंबाजोबाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यातील एकुण १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये  उस्मानाबाद शहरातील राम नगर येथील १, नेहरु चौक १, शहरानजीक शेकापूर येथील १  आणि तात्पुरत्या कारागृहातील ६ कैद्यांचा जणांचा समावेश आहे. सहा कैदी डाएटच्या जुन्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात विशेष निगराणीत आहेत.

भूम तालुक्यातही ५ कोरोनाबाधित आढळून आले असून वालवड १ आणि राळेसांगवी येथील ४ जणांचा समावेश आहे. उमरगा तालुक्यातही ४ जणांना लागण झाली असून ३ उमरगा शहर तर १ मुरूम शहरातील आहे. त्यामुळे मुरूम शहरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  ३५४ वर पोहचली असून, २२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर १४ जणांचा बळी गेला आहे. उर्वरित रुग्ण उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात २७,  शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद १२, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय २, कळंब येथील कोविड कक्षात २८, उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १८, उमरगा येथील खासगी रुग्णालय विजय क्लिनिक येथे ८ तर शेंडगे हॉस्पिटल २ यासह सोलापुरात ८, लातूर ५, पुणे १, बार्शी १ अशा एकुण ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 10:30 pm

Web Title: osmanabad 19 people including six prisoners tested corona positive msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत संपूर्ण संचारबंदी
2 चिंताजनक, रायगडमधील करोनाबाधितांनी ओलांडला सात हजाराचा टप्पा   
3 अकोल्यात करोनाचा आणखी एक बळी; १० नवे रुग्ण
Just Now!
X