पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू च संकट अधिक गडद होतं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टी शिवकुमार निलगे यांनी घेतला आहे. गेल्या २५ वर्षानंतर पहिल्यांदाच हे मंदिर बंद ठेवण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली आहे. शहरात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणं आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध साई मंदिरात दररोज हजारो साई भक्त दर्शन घेण्यासाठी रांग लावतात. त्यामुळे याठिकाणी खूप गर्दी होते. त्यामुळेच येथील मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला असून गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच हे मंदिर बंद राहणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आणि पुणे येथे कोरोना ने थैमान घातले असून आत्ता पर्यंत १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी शिवकुमार निलगे यांनी साई भक्तांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केले असून गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती निवळल्यावर पुन्हा साई मंदिर भक्तासाठी सुरू असेल असं ही ते म्हणाले आहेत. दरम्यान, दररोज केली जाणारी पूजा ही नियमित होणार आहे असं ही त्यांनी सांगितले.