26 February 2021

News Flash

…अशा परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत; पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिला शब्द

समन्वयासाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

फाइल फोटो

“आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून, संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून निर्णय घेण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. यावेळी महाराष्ट्रात, विशेषत: ५ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली, तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच  नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी, अशी मागणी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तप्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम  या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि सहा ही राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी, एनडीआरएफ आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, सचिव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन किशोरराजे निंबाळकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत जाहीर करा- मुख्यमंत्री

“निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ०६५ कोटी हून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ५  ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे,” अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली. मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे  स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर द्यावा

अतिवृष्टी आणि पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. नदीकाठी पुररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील पाऊस स्थिती

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. ते म्हणाले की,  “मुंबई मध्ये  ५  ऑगस्ट २०२० ला  २४ तासात ३३३ मिमी पाऊस झाला तर  ७० ते ८० किमी प्रती तास  व जास्तीत जास्त १०६ कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहिले. कोणालाही कल्पना नव्हती एवढे मोठे संकट येईल ते पण आले. याही परिस्थितीत राज्य शासनाने आणि महापालिकेने सज्जता दाखवत पुढील काही तासांमध्ये स्थिती पुर्वपदावर आणली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात अनेक ठिकाणे ही सखल भागात ( लो लेवल) आहेत. त्यामुळे जेंव्हा समुद्राला भरती असते तेंव्हा आणि अतिवृष्टी झाली की पाणी साचतेच.  महापालिकेच्या पंपींगस्टेशन्सच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी सक्षमपणे अनेकठिकाणी चांगले काम केल्याने मोठ्या दुर्घटना टाळता आली,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नदी जोड प्रकल्प, रिअर टाईम डाटा साठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, नदी किनारी होणारी अतिक्रमणे, फ्लड डॅम्स उभारणे, पुरग्रस्त भागातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे अशा महत्वाच्या विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 7:11 pm

Web Title: pm narendra modi meeting with six states chief minister including uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 “एक्स्प्रेस, मेल तसंच लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार हे वृत्त चुकीचं”
2 ..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा इशारा
3 “सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य समोर येईल”
Just Now!
X