शिक्षणाचा वटवृक्ष म्हणून ओळख असलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत अध्यक्ष शरद पवार यांनी हुकूमशाही आणली असून संस्थेत सध्या मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची टीका संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. उत्तमराव गंगाराम तथा यू. जी. पाटील यांनी आरोपपत्राद्वारे केली. शुक्रवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पवारांनी अर्ज भरू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे २०१४ ते २०१७ या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या आणि अन्य निवडीसाठी शुक्रवारी सभा होत आहे. या सभेच्या पाश्र्वभूमीवर सध्या ‘रयत’मध्ये खांदेपालटाची चर्चा आहे.
पाटील यांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, ९ एप्रिल १९८९ पासून शरद पवार हे सलग २५ वष्रे संस्थेच्या अध्यक्षपदावर आहेत. १९८९ पासून ९ मे २००८ पर्यंत प्रा. एन. डी. पाटील रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. शरद पवार व प्रा. पाटील यांनी १९९४ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या घटनेचा मूळ ढाचाच बदलून टाकला. त्यापूर्वी संस्थेचे प्रशासन लोकशाही पद्धतीने चालत होते. परंतु, १९८९ पासून संस्थेत लोकशाही कागदावर तर, हुकूमशाही प्रत्यक्षात चालू झाली आहे.
संस्थेच्या कार्यकारिणीवर पवार यांनी कुटुंबातील आणि पक्षातील लोकांना समाविष्ट केले आहे. यामध्ये त्यांचे मेव्हणे एन. डी. पाटील, पुतणे अजित पवार, बहीण सरोज नारायण पाटील आणि मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. त्यांचा हा गोतावळाच सध्या संस्थेचा मालक झाला आहे. पक्षाच्याही अनेक पदाधिकाऱ्यांना पवारांनी या संस्थेच्या कार्यकारिणीवर घेतले आहे. इतर शिक्षण सम्राटांच्या शिक्षणसंस्था व रयत शिक्षण संस्थेत आता फरक राहिला नाही. बदल्या, नेमणुकीसाठी पैसे घेतले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
देणग्या, नेमणुकांमध्येही अनेक गैरव्यवहार होत असल्याची टीका यू.जी. पाटील यांनी या आरोपपत्रात केली आहे. या सर्व आरोपांच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी चालू निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कर्मवीरांचा आदर्श लयाला..
कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, वाढवली. त्यांच्या हयातीत संस्थेच्या कोणत्याही शाखेस त्यांनी आपले स्वत:चे नाव दिले नाही. शरद पवारांनी आपल्या हयातीतच आपले स्वत:चे स्मारक उभे करत लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील महाविद्यालयाला ‘शरदचंद्रजी पवार कॉलेज’ असे नाव दिले  आहे. याचेच अनुकरण प्रा. एन. डी. पाटील यांच्या कार्यकाळातही झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज’ला ‘डॉ. एन.डी. पाटील आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज’ असे नाव देण्यात आले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही