विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे महाराष्ट्र दिनी स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री यांचे पुतळे जाळण्याचे आवाहन केले आहे. 

कर्जमुक्ती व विजबिलमुक्ती आंदोलन व नव्या भूसंपादन शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी व मार्गदर्शन सेवा सहकारी सोसायटीतील विजयी संचालकांचा सत्कार, विदर्भ राज्याचे आंदोलन आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी नुकतेच कोरपना व राजुरा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बठकीला माजी आमदार व शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, जिल्हा प्रमुख प्रभाकर दिवे, अ‍ॅड. मुरलीधर देवाडकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, अरुण नवले, पौर्णिमा निरंजने, प्राचार्य अनिल ठाकुरवार, आदींची उपस्थिती होती. स्वतंत्र्य विदर्भ राज्याची मागणी जुनी आहे. यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. भाजप नेते नितीन गडकरी, देवेद्र फडणवीस यांनी यापूर्वी या मागणीला पाठिंबा दिला होता, तसेच भाजप सत्तेत आल्यास विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते.
नितीन गडकरी केंद्रात मंत्री, तर देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री झाले आहेत, परंतु या नेत्यांनी आता विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुलक्र्ष करीत असल्याने हे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बठकीला शेतकरी संघटना, शेतकरी युवा आघाडी, शेतकरी महिला आघाडी, व स्वतंत्र भारत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.