मावळ तालुक्यातील भंडारा डोंगरावरून उतरताना पॅगो रिक्षाला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या बारा वारकरी महिला जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरासची घटना.

भंडारा डोंगर येथील उताराच्या रस्त्याने जात असताना एका वळणार चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. या रिक्षातून १२ वारकरी महिला प्रवास करीत होत्या. यांपैकी सात महिला गंभीर तर पाच महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींना देहूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी पंढरीच्या वारीला निघालेल्या दोन महिला वारकऱ्यांचा मोशी येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना उडवले होते.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या ठिकाणी आषाढी वारीमध्ये सामिल होण्यासाठी अपघातात जखमी झालेल्या महिला रिक्षातून निघाल्या होत्या. मात्र, वाटेत त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्या महिला कुठल्या रहिवाशी होत्या, तसेच त्यांची नावे काय होती हे अद्याप कळू शकलेले नाही.