लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोना संकटामुळे शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा व शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचा कालावधी लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाने तातडीने दहावी व बारावीचा अभ्यासक्रम कमी करावा, अशी मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यात करोनाचे संकटामुळे शाळा सुरू करून विद्यााथ्र्यांना प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याबाबत अनिश्चिातता आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे विभागाकडून शिक्षकांना दिली जात आहेत. मात्र, विद्यााथ्र्यांकडे सुविधांचा असणारा अभाव या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करण्याचा कालावधी किती मिळेल हे आजही निश्चिात नाही. अशा परिस्थितीत वर्ग नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम ३० टक्के कमी करण्याचा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला. करोना संकटकाळात राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अध्यापन आणि अध्ययन कार्याला सोयीचे व्हावे यासाठी सीबीएसई धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा अभ्यासक्रम तातडीने कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्याावा, अशी मागणी डॉ.अविनाश बोर्डे यांनी केली.