खासदार नवनीत राणा वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असतात. आताही त्या चर्चेत आल्या आहेत पण त्याचं कारण आहे रुपाली चाकणकरांचं एक ट्विट. या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ आहे ज्यात त्या चुलीवर स्वयंपाक करत आहेत. आणि याचं कारण रुपाली चाकणकरांच्या मते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जाणून घ्या काय आहे त्यांचं हे ट्विट….

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या व्हिडीओमध्ये चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामध्ये त्या चपात्या लाटून चुलीवरील भाजत आहेत. हा व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन


रुपाली चाकणकर म्हणतात, गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅसऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!.

या व्हिडीओच्या माध्यमातून काही नेटकऱ्यांनी उज्ज्वला योजना अपयशी झाल्याचीही टीका केली आहे. महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटींहून अधिक मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र, या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने असंख्य कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.