27 January 2021

News Flash

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला; उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

समाजकंटकांनी फाडलेले बॅनर. (छायाचित्र/विश्वास पवार)

-विश्वास पवार

राज्यात औरंगाबाद शहराचा नामांतराचा वाद शिगेला असताना साताऱ्यात संतप्त घटना घडली आहे. सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (दि ९ जानेवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. उदयनराजे समर्थक मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. पोलिसांच्या ही बाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला.

 

त्यानंतर उदयनराजे समर्थक ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते या घटनेमागे कोण आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा संतप्त पवित्रा घेतला. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले. संतप्त कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांत या प्रकारावरून बराच वेळ चर्चा सुरू होती. या घटनेचे पडसाद उमटून सातारा शहरात तणावाचे वातावरण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:26 pm

Web Title: sambhaji maharaj name banner tore off in satara which inaugurated by udayan raje bhosle bmh 90
Next Stories
1 कोवळे जीव उमलण्याआधीच धुरात कोमजले; मातांच्या आक्रोशानं भिंतीही शहारल्या
2 भंडारा अग्नितांडव प्रकरण- भाजपाच्या चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारकडे मागणी
3 भंडारा अग्नितांडव प्रकरण- मृत बालकांच्या कुटुंबियांना ठाकरे सरकारकडून आर्थिक मदत
Just Now!
X