सामना या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिकातल्या लेखात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी केल्याप्रकरणी होळकर घराण्याकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. होळकर घराण्याचे भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित निषेध नोंदवला आहे.

आपल्या या पत्रात होळकर यांनी या लेखावरुन संजय राऊत यांची वैचारिक पातळी लक्षात येत असल्याची टीका केली आहे. ते म्हणतात, “आपण, पक्ष, राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा पण त्यामध्ये जर आपण राष्ट्रपुरुषांची नावे वापरुन त्यांची तुलना जर आजच्या नेत्यांशी करत असाल तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही.”

या पत्रात त्यांनी ममता बॅनर्जी यांना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणारा नेता असंही संबोधलं आहे. तसंच अहिल्याबाईंचे विचार आचरणात आणून त्यांच्यासारखी कृती केल्यावर जनता आपली योग्यता ठरवेल असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या पत्रात होळकर म्हणतात, “रयतेचे कल्याण हेच सर्वोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या आजच्या युगातल्या एका नेत्याशी कधीच होऊ शकणार नाही. आधी अहिल्या मासाहेबांचे विचार आचरणात आणा, त्यांच्यासारखा रयतेचा सांभाळ करा, मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही.”