31 October 2020

News Flash

…म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही; शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

"काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान खरं आहे."

शिवसेना नेते खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्यात २०१९ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अनेक राजकीय नाट्यं बघायला मिळाली. मुख्यमंत्रिपदावरून भाजपा शिवसेनेतील मतभेद टोकाला गेले. दोन्ही पक्षातील संबंध इतके ताणले गेले की, नंतर शिवसेनेनं भाजपापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या राजकीय नाट्याची अनेक कारणं नंतर चर्चिली गेली. पण, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपापासून दूर जाण्याचं एक कारण बोलून दाखवलं आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि राजकीय विषयावर भाष्य केलं. “तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकजुटीनं राज्यात काम करत आहे. त्यामुळे विरोधकांना डोकेदुखी सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप चुकीचा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे, हे फडणवीसांनाही माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानं ते आरोप करत आहेत. पण, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहराची स्थिती सगळ्यानांच माहिती आहे. राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल,” असं राऊत म्हणाले.

“मागील ३० वर्षांपासून शिवसेना भाजपासोबत होती. शिवसेनेमुळे युती तुटली, हा आरोप चुकीचा आहे. टाळी कधीही एका हातानं वाजत नाही. भाजपाच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्यासोबत राहिली. पण, भाजपाला सत्तेची लालची आहे. सत्तेसाठी ते आपल्या मित्र पक्षाचं बलिदान देऊ पाहत होते. त्यामुळे आज शिवसेना भाजपासोबत नाही,” असं राऊत यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाविषयीही राऊत यांनी भाष्य केलं. “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं विधान खरं आहे. काँग्रेसचे मोठे नेते राज्यातील निर्णयांमध्ये सहभागी होत नाही,” असं राऊत यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:03 pm

Web Title: sanjay raut says why shivsena broke alliance with bjp bmh 90
Next Stories
1 सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम : तीन फुटांचे अंतर, मास्क आवश्यक; दिवसातून तीनवेळा सॅनेटायझेशन
2 राजेंद्र जाधवांनी तयार केलेल्या ‘यशंवत’ची निर्मिती गाथा
3 नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या शोधाचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक
Just Now!
X