12 December 2019

News Flash

नांदेड : अस्वल पाहून शाळकरी मुलगा जीव वाचवण्यासाठी पळाला, पण…

शाळेला सुट्या असल्याने शेताकडे गेलेल्या शाळकरी मुलाला शेतात अस्वल दिसल्याने ...

शाळेला सुट्या असल्याने शेताकडे गेलेल्या शाळकरी मुलाला शेतात अस्वल दिसल्याने घाबरून जाऊन घराकडे पळत असताना विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या डुंड्रा येथे घडली असून याबाबत सिंदखेड पोलिसांत आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे डुंड्रा ता.किनवट येथील वंश गणेश सल्लावार (वय 15) हा दि.11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान त्याच्या काकाची बैलजोडी शेतात चारण्यासाठी घेवून गेला होता. शेतात त्याच्या शेजारी थोड्या अंतरावर महिला कापूस वेचत होत्या तेवढ्यात वंश याला शेतात अस्वल दिसल्यामुळे तो खूप घाबरला. याच अवस्थेत तो इकडे-तिकडे पळत असताना बाजूला असलेल्या विहीरीत पडला यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मोहन नारायण सल्लावार रा.डुंड्रा ता.किनवट यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.पो.कॉ.बबन गुहाडे हे करीत आहेत.

First Published on November 13, 2019 8:52 am

Web Title: school boy from nanded died when he was trying to run away from bear nanded nck 90
Just Now!
X