वन्यप्राणी व्यवस्थापन समितीच्या चौकीदारावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम जंगलात घडली. पांडूरंग धोंडूजी आत्राम (५५, रा. घनोटी तुकूम) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यातील  ही दुसरी घटना असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.
दुपारी १२.३०च्या सुमारास शिदोरी खाऊन एका झाडाखाली विश्रांती करताना पांडुरंग झोपी गेले असताना  दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने आत्राम याच्यावर हल्ला केला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.