News Flash

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचं निधन

काही दिवसांपूर्वी करोनावर केली होती मात

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचं निधन

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी देवळेकर यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. कल्याण-डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

सलग चार वेळा राजेंद्र देवळेकर हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. संघटनेसाठी कायम झटणारे नेते, मनमिळावू आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून देवळेकर परिचयाचे होते. २०१५ मध्ये निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाल्यानंतर देवळेकर यांची महापौरपदी निवड करण्यात आली. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामं मार्ग लावली. पालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधानाचं वृत्त समजताच सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 12:07 pm

Web Title: shiv sena kalyan dombivali former mayor rajendra devlekar passes away jud 87
Next Stories
1 राज्यातील पहिले पत्रकार करोना केअर सेंटर सातार्‍यात
2 पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3 वाहतूक कोंडीवर उतारा
Just Now!
X