News Flash

‘सिंधुदुर्गाची प्रगतीकडे वाटचाल’

सिंधुदुर्ग जिल्हा सर्वागिण प्रगतीकडे वाटचाल करीत आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा सर्वागिण प्रगतीकडे वाटचाल करीत आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सावंतवाडी :  चांदा ते बांदा,कोकण ग्रामीण पर्यटन,स्वदेश दर्शन,जिल्हा नियोजन समितीचे १६० कोटी रुपयांचा आराखडा याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यची कृषी,पर्यटन,मत्स्य व्यवसाय क्षेत्रात वेगाने वाटचाल सुरु असून सिंधुदुर्ग जिल्हा सर्वागिण प्रगतीकडे वाटचाल करीत आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिवद्र सावळकर,जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह,अप्पर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी उपस्थित होते.  पर्यटनाच्या विविध प्रकल्पाद्वारे तसेच काथ्या उद्योगयामधून आगामी कालावधीत मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, महिला बचत गटांसाठी पोल्ट्री ,शेळीपालन याच बरोबर चांदा ते बांदा योजनेअंतर्गत खेकडा पालन,कोळंबी संवर्धन या योजनांद्वारेही रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यच्या दरडोई उत्पनात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून या सर्व योजना सहाय्यभूत ठरणार आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस,गृहरक्षक दल, वन विभाग यांच्या महिला व पुरुष दलांनी यावेळी शानदार संचलानाद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदान दिली.  महाराष्ट्र दिना-निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी  विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिंधु विकास दूत यामध्ये स. ह. केळकर महाविद्यालय देवगड- प्रथम,लोकनेते दत्ता पाटील मेडीकल कॉलेज वेंगुर्ला- द्वितीय तर तृतीय क्रमांक विभागून कणकवली कॉलेज कणकवली व आनंदीबाई रावराणे ऑर्ट,सायन्स कॉलेज वैभववाडी यांना देण्यात आला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग भारत स्काऊड गाईड पुरस्कार पुढीलप्रमाणे – आंबिये,अंकिता बांदेकर मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी, आदिती मालपेकर, श्रद्धा सावंत विद्यामंदीर हायस्कूल कणकवली, नेहा माहुरे डॉन बास्को ओरोस,महिमा केळुसकर,निशा तारी यांना देण्यात आला.

आदर्श तलाठी पुरस्कार- पी. डी. लोबो यांना रोख ५ हजार व प्रमाणपत्र देण्यात आले. पोलीस विभागातील पुढील अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबाबत यावेळी गौरविण्यात आले. विश्वजीत काईंगडे, प्रभाकर शिवगण,  सुरेश वारंग,विजय चव्हाण,अमोल सरंगळे,संजय साटम, विलास कुंभार, नंदकुमार शेटिये.

उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार- प्रथम क्रमांक दिनानाथ द्वारकानाथ गावडे (मे. रुचिरा फुड), द्वितीय श्रीम. उज्वला आनंदा नलावडे (श्री. दत्त कॉयर इंडस्ट्रीज), जिल्हा क्रिडा पुरस्कार गुणवंत खेळाडू युक्ता प्रमोद सावंत, कुणकेरी ता. सावंतवाडी,श्रीवल्लभ श्रीकृष्ण सावंत कोलगाव ता. सावंतवाडी,स्मार्टग्राम पुरस्कार जिल्ह्यातील पुढील ग्रामपंचायतीना स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. हुमरमळा ता. कुडाळ, परुळे बाजार ता. वेंगुर्ला, पाटगांव ता. देवगड, आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग,कोळोशी ता. कणकवली,धामापूर ता. मालवण, नापणे ता. वैभववाडी,बांदा व मळगाव ता. सावंतवाडी.  मुख्य शासकीय ध्वजारोहणापूर्वी सकाळी ७.१० वाजता अप्पर जिल्हाधिकारी रिवद्र सावळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात तर जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ध्वजारोहण समारंभास शासकीय खाते प्रमुख,नागरिक,पत्रकार उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:25 am

Web Title: sindhudurg moving towards progress
Next Stories
1 कोकणात सीआरझेड रद्द करणार?
2 खरेदी बंद झाल्याने विदर्भात तूर‘कल्लोळ’!
3 राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
Just Now!
X