23 September 2020

News Flash

स्वतःवर गोळी झाडून घेत SRPF जवानाची आत्महत्या

घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

(सांकेतिक छायाचित्र)

नागपुरातील संविधान चौकात असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सेवेत असलेल्या एका एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडत आत्महत्या केली. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. प्रसन्ना मस्के असं या जवानाचं नाव होतं. तो २९ वर्षांचा होता. एसआरपीएफ ग्रुप क्रमांक चारच्या तुकडीत तो कार्यरत होता. नेहमीप्रमाणे प्रसन्ना नाईट ड्युटीसाठी आला. आरबीआयमध्ये गस्तीसाठी गेलेला असताना गोळीचा आवाज आला. त्यानंतर इतर जवानांनी धाव घेतली तेव्हा प्रसन्नाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे त्यांनी पाहिले. ही माहिती तातडीने आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. प्रसन्नाला लगेचच जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या घरगुती वादातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 9:23 am

Web Title: srpf jawan committed suicide in nagpur scj 81
Next Stories
1 पाच वर्षांत एक कोटीहून अधिक झाडांची कत्तल
2 आरक्षण घेतल्यामुळे मराठा समाजही सरकारी जावई – प्रकाश आंबेडकर
3 केळकर समितीचा अहवाल फेटाळला नाही
Just Now!
X