राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे काका आणि पुतण्यात निर्माण झालेला दुरावा मकर संक्रांतीच्या निमित्ताने दूर झाला. सुनील तटकरे यांनी जाहीर कार्यक्रमात आमदार अवधूत तटकरे यांना तीळगूळ भरवून दोघांमध्ये निर्माण झालेला अबोला संपवण्याचा प्रयत्न केला. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असा सल्लाही त्यांनी यावेळी अवधूत तटकरे यांना दिला.

दोन कुटुंबातील राजकीय महत्त्वाकांक्षामुळे तटकरे कुटुंबात वाद निर्माण झाला होता. आधी श्रीवर्धन विधानसभा निवडणूक आणि नंतर रोहा नगरपालिका निवडणुकी निमित्ताने हा वाद अधिकच उफाळून आला होता. अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप करून दोन्ही कुटुंबात समेट घडवून आणली होती. मात्र सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यातील अबोला कायम होता.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

यानंतरही अवधूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहणे पसंत केले होते. रोहा आणि श्रीवर्धन मतदारसंघात ते फारसे सक्रिय नव्हते, त्यामुळे त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे सातत्याने प्रयत्नशील होते. शरद पवार आणि अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या रायगड जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान अवधूत तटकरे यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली होती.

त्यामुळे दोन कुटुंबातील कटुता अद्याप संपुष्टात आली नसल्याचे जाणवत होते. रोहा पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर काका-पुतणे एकाच व्यासपीठावर आले. अखेर सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन अवधूत यांना आपल्या बाजूची जागा दिली. एवढेच नव्हे तर कार्यक्रमाच्या शेवटी अवधूत यांना तीळगुळाचा लाडू देऊन दोघांमधील अबोला दूर करण्याचाही प्रयत्न केला. मग अवधूत यांनीही काका सुनील तटकरे यांना लाडू भरवून दिलखुलास दाद दिली. काका-पुतण्याच्या संबंधांत निर्माण झालेला हा गोडवा असाच कायम राहावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

रोहा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कडवे आव्हान देणाऱ्या सेनेच्या समीर शेडगे यांनाही लाडू भरवून सुनील तटकरे यांनी गोड बोलण्याचा सल्ला दिला. यावेळी राजन वेलकर, राही भिडे, राजेश डांगळे यांचे सत्कार करण्यात आले. रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यावेळी उपस्थित होते.