03 June 2020

News Flash

निलंबित भिकाजी घुगे यास ‘महसूल’मध्ये परत पाठविण्याचा पुरवठा विभागाचा निर्णय

उस्मानाबाद येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व दोन दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या भिकाजी घुगे यांना महसूल विभागात परत पाठवले

| December 25, 2014 01:30 am

 उस्मानाबाद येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व दोन दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या भिकाजी घुगे यांना महसूल विभागात परत पाठवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज हा तडकाफडकी निर्णय घेतला.
उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या भिकाजी घुगे यांची अन्न व नागरी पुरवठा विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. नांदेडमध्ये भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या भिकाजी घुगे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या अहवालानंतर राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केले होते. निलंबनानंतर त्यांना िहगोली येथे पदस्थापना मिळाली. तेथेही त्यांनी आपल्या कामकाजाची पद्धत बदलली नाही. िहगोली येथे त्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी झाल्या. २१ ऑगस्ट २०१४पासून उस्मानाबाद येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या भिकाजी घुगे यांना २२ डिसेंबर रोजी १२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याकडील लाखो रुपयाची बेहिशोबी मालमत्ता उघड केली होती.
घुगे यांच्या या कारवाईनंतर आधीच मलिन असलेल्या पुरवठा विभागाची प्रतिमा आणखीनच मलिन झाली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घुगे यांना जिल्हा पुरवठा अधिकारी पदावरून तात्काळ कार्यमुक्त करत त्यांना महसूल विभागात परत पाठवले आहे. घुगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर जिल्ह्यातल्या काही अधिकाऱ्यांनी ‘हे घडणारच होते’ अशी प्रतिक्रिया खासगीत नोंदवली. एखाद्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई होणे अलीकडच्या काळातील पहिलीच घटना मानली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2014 1:30 am

Web Title: suspended officer bhikaji ghuge return in revenue
Next Stories
1 नापिकीत मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
2 तेरणा कारखाना जमीन प्रकरण; शिवसेनेच्या दणक्याने लिलाव रद्द
3 जैतापूर प्रकल्प होणारच ; विधान परिषदेत सरकारची ग्वाही
Just Now!
X