News Flash

मतदान करुन येत असताना उलटला तराफा, ९५ जण थोडक्यात बचावले

तानसामधील बोराळा गावातली घटना

मतदान करुन येत असताना तराफा उलटला. या घटनेतून ९५ जण थोडक्यात बचावले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या बोराळा गावात ही घटना घडली आहे. मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र ९५ जण मतदान करुन परतत असताना तानसाच्या पात्रातून तराफ्यातून ९५ जण येत होते. त्याचवेळी हा तराफा उलटला मात्र ९५ जण बचावले आहे. ते बचावले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.

रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच या सगळ्यांना जावं लागलं. तानसा गावात जाऊन मतदान करुन हे सगळे जण परत बोराळा या ठिकाणी परतत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. हा तराफा बुडाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि मच्छिमारांनी बुडत असलेल्या नागरिकांना ओढून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तानसा मतदान केंद्रावरुन मतदान करुन परतत असताना ही घटना घडली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 10:05 pm

Web Title: tarafa drown in the river 95 people save by local people scj 81
Next Stories
1 माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती खालावली
2 भारताची संस्कृती आणि वारसा अभ्यासकांसाठी चांगली संधी; शासनाचा मुंबईत अभ्यासक्रम
3 …म्हणून ‘या’ मतदारसंघात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान !
Just Now!
X