आदिवासी विकास विभाग संचालित तवा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यानी विहरीतील दुषित पाणी पायायल्याने रविवारी १६ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाबाची लागण होऊन प्रकृती खालावल्याची घटना रविवारी घडली. यानंतर विद्यार्थ्यांना कासा‍ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या ११ जणांन‍ा सुट्टी देण्यात आली आहे. तर ५ विद्यार्थ्यांची प्रकृती अद्यापही सुधारलेली नसुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आश्रमशाळेला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने महिनाभरापासून विद्या्र्थांन‍ा विहिरीतील दुषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाला तक्रारीही केल्या होत्या. तर काही दिवसांपुर्वी याच‍आश्रमशाळेत शिकणाऱ्या नैतिक नितीन तल्हा (र‍ा. आंवढ‍ाणी कोमपाडा) या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्य‍ाचा आजारपणात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र यानंतरही विद्य‍ार्थ्यांच्या आरोग्याकडे शाळा व्यवस्थ‍पानाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून डहाणू, तलासरी, पालघर, वसई यासख्या आदिवासीबहूल क्षेत्रात १७ निवासी वस्तीगृहे तसेच ३५ आश्रमशाळा याबरोबर अनुदानीत शाळा सुरु केल्या आहेत. मात्र, अनेक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मुलभुत सुविध‍ांची वानवा आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर तवा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा असुन त्यामध्ये आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, पाण्याच्या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांना खराब पाण्याता अंघोळ करावी लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी विहीरीतील दुषित पाणी पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. आमदार अमित घोडा यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली तसेच संबंधीत प्रकाराचा खुलासा करण्याबाबत आदिवासी विकास विभागालाही सुचना केल्या आहेत.

तव‍ा आश्रमशाळवतील चार विद्यार्थी रूग्णालयात उपचार घेत असुन, इतरांना उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. पाण्याचे नमुने गोळा करुन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे आदिवासी विकास उपविभाग डहाणूचे प्रकल्प अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगतिले आहे.

आदिवासी विकास विभागात आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या नावाखाली खेळ सुरु आहे. काही दिवसांपुर्वी तवा आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. त्यानंतर लगेचच ही दुसरी घटना घडली आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी, अशी सामाजिक कार्यकर्ते अरूण धोडी यांनी मागणी केली आहे.