News Flash

वडील रागवल्याने दहा वर्षीय मुलाची आत्महत्या

आई-वडील कामाला गेल्यावर घरातच घेतला गळफास

प्रतिकात्मक छायाचित्र

वडील रागवल्याने एका दहा वर्षीय मुलाने चक्क गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात घडली आहे. महात्मा फुले इंग्लिश स्कूल आकुर्डी येथे हा मुलागा शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली राहणाऱ्या या मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल (सोमवार) घरात या मुलाकडून मटणाची भाजी सांडल्याने त्याच्या वडिलांनी त्याला रागावले होते. याच रागातून त्याने आज(मंगळवार) दुपारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृत मुलाचे वडील हे टॅक्सीचालक असून आई घरकाम करून घर करते. आई-वडील दोघेही कामासाठी बाहेर गेल्यानंतर घरात केवळ या मुलाची तीन वर्षांची लहान बहीण होती. तेव्हा त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 8:15 pm

Web Title: ten year old boy commits suicide after father gets angry msr kjp 91
Next Stories
1 ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमात यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम
2 यवतमाळ जिल्ह्यात पुसद, दिग्रसमध्ये सात दिवसांची टाळेबंदी
3 सातारा जिल्ह्यात करोनाचे सामूहिक संक्रमण नाही : शंभूराज देसाई
Just Now!
X