राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउची घोषणा केली आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

“लॉकडाउनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल. कोविड प्रतिबंधासाठी जो ३३०० कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Lockdown : राज्यात संचारबंदीत लोकल, बससेवा सुरू राहतील पण ….

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

तसेच, “मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण, बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे. ” अशी मागणी देखील फडणवीस यांनी केलेली आहे.