करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरी देखील जिल्ह्यात दररोज करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता दहा हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ८८ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ९ हजार ८३२ झाली आहे. यापैकी ५ हजार ६३६ जणांनी करोनावर मात केलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ८१९ जणांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेल्या ८८ नव्या करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहर हद्दीतील ४२ व ग्रामीण हद्दीतील ४० जणांचा समावेश आहे. तर, सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहाजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहाता औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील येथे दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.