राज्यात आज नव्या करोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हे प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज ३,०८१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला. आज नवीन २,३४२ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १८,८६,४६९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७६ टक्के झालं आहे.

पुण्यात दिवसभरात आढळले २७३ रुग्ण, तिघांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २७३ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १, ७५, ९७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२३ करोनाबाधितांची नोंद झाली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The recovery rate of corona patients reached in maharashtra at 94 percents aau
First published on: 17-01-2021 at 20:42 IST