News Flash

भाजपा आमदार आशिष शेलारांना धमकीचे फोन, वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार

मुंब्रा येथून दोघांना करण्यात आली अटक

(संग्रहित छायाचित्र)

भाजपाचे नेते आणि आमदार अॅड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. यासंदर्भातली तक्रार आशिष शेलार यांनी कालच केली आहे. दरम्यान याप्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार सातत्याने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. त्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. टीव्ही नाइनने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

अॅड. आशिष शेलार यांनी कालच वांद्रे पोलीस ठाण्यात यासंदर्भातली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत मुंब्रा या ठिकाणाहून दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 6:19 pm

Web Title: threatening phone to bjp mla ashish shelar scj 81
Next Stories
1 राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 उद्धव ठाकरे-राज्यपाल कोश्यारी वादात कंगनाची उडी, म्हणाली…
3 मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या
Just Now!
X