रायगड जिल्ह्य़ातील ३६ ग्रामपंचायतींमध्ये आज (२८ ऑक्टोबर) मतदान होणार आहे. १४२ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. २९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ऑक्टोबरअखेर मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील ४० ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर ८१ ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ४० पकी चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ३६ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १२९६ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. यातील ११९९ अर्ज वैध ठरले. ४८६ जणांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेतली. निवडणुकीसाठी ७१३ उमेदवार निवडणूक िरगणात असणार आहेत. पेण तालुक्यात ४, उरणमध्ये ६, कर्जतमध्ये ४, रोहा तालुक्यात १७, म्हसळा तालुक्यात २ व श्रीवर्धनमध्ये ३ अशा एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या ११५ प्रभागांमधील २९५ जागांसाठी आता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. पेण तालुक्यात २०, उरणमध्ये ३६, कर्जत तालुक्यात १८, रोहा तालुक्यात ६५, म्हसळ्यात ५ व श्रीवर्धनमध्ये ८ अशा एकूण १४२ मतदान केंद्रांवर २८ तारखेला मतदान होईल. २९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात येणार आहे. मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.ं